चार तोतया अधिकारी अटकेत; पोलिसांनी उधळला गळ्यात सरकारी आयडी आणि खंडणीचा खेळ

गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड आणि तोंडावर सरकारी अधिकारी असल्याचा आव आणून दुकानदारांना धमकावणाऱ्या टोळीचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
चार तोतया अधिकारी अटकेत; पोलिसांनी उधळला गळ्यात सरकारी आयडी आणि खंडणीचा खेळ
Published on

उल्हासनगर : गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड आणि तोंडावर सरकारी अधिकारी असल्याचा आव आणून दुकानदारांना धमकावणाऱ्या टोळीचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. किराणा स्टोअरवर सरकारी तपासणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या या टोळीची शक्कल एका सतर्क दुकानदाराने हाणून पाडली आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईने चारही आरोपी गजाआड झाले. उल्हासनगर कॅम्प नंबर तीनमधील किशन किराणा स्टोअरमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांनी गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड घालून प्रवेश केला. 'दुकानाची तपासणी करायची आहे,' असे सांगत त्यांनी दुकानदाराला गोंधळात टाकले. मात्र त्यांची खरी योजना दुकानाची तपासणी करण्याऐवजी खंडणी वसूल करण्याची होती. त्यांनी दुकानदाराला धमकावत सांगितले, 'तपासणी टाळायची असल्यास दोन लाख रुपये द्यावे लागतील.' या प्रकरणात पोलिसांनी वैभव बगाडे, संतोष पारकर, शुभदा विचारे आणि शिल्पा पालांडे या चार आरोपींना अटक केली आहे.

या टोळीच्या अन्य कारवायांचा शोध घेतला जात आहे. त्यांना कडक शिक्षा होईल, यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी तपासणीच्या नावाखाली कोणत्याही स्वरूपाची धमकी किंवा फसवणूक स्वीकारली जाऊ शकत नाही.

- शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्ष

logo
marathi.freepressjournal.in