रेल्वे अपघातात एका दिवसात चाैघांचा मृत्यू; 
तीन महिला, तर एका पुरुषाचा समावेश

रेल्वे अपघातात एका दिवसात चाैघांचा मृत्यू; तीन महिला, तर एका पुरुषाचा समावेश

दुसऱ्या घटनेत पहाटेच्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीची ठोकर लागून ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.

डोंबिवली : रेल्वे अपघातात एका दिवसात चाैघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. यातील दोन अपघात डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडले. तर दोन अपघात ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घडला. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे गाडीतून पडून सुशील नारायण कुतरण याचा जागीच मृत्यू झाला. हा डोंबिवली पूर्वेकडील अंबिका हॉटेलजवळील परिसरात राहत होता.

दुसऱ्या घटनेत पहाटेच्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीची ठोकर लागून ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. यात घटनेतील महिलेची ओळख पटली नाही. तिसऱ्या घटनेत ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास लोकल गाडीची ठोकर लागून ४५ ते ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत महिलेची ओळख पटली नाही. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलची ठोकर लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याही घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in