
उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथे मानस अपार्टमेंट नावाची ही इमारत आहे, उल्हासनगर महानगरपालिका ने या इमारतीला धोकादायक घोषित केले आहे, तरी देखील काही कुटुंब या इमारतीत राहत होते, आज सकाळी या इमारिताचा चौथ्या मजल्याच्या स्लॅब अचानक तळ मजल्यावर कोसळला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला देताच उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमक दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्लॅपच्या ढिगाऱ्या काही जण अडकले असल्याचे नागरिकांकडून समजताच अग्निशमक दलाच्या पथकाने तात्काळ मलबा हटवीण्याचे काम सुरु केले.
या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
मयत झालेल्यांची नावे
सागर ओचानी १९ वय,
रेणू धोलांदास धनवानी ५५ वय,
धोलानदास धनावनी ५८वय,
प्रिया धनवानी २४ वय अशी आहेत.
मयत झालेल्यामध्ये एकाच परिवारातील तीन जणांचा समावेश आहे.
उल्हासनगर महापालिकेने 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षी सदर इमारत धोकादायक असून तिचे सर्वेक्षण करण्याचे पत्र दिले होते. मात्र तरी देखील रहिवासी या इमारतीत राहत होते. या घटनेने संपुर्ण उल्हासनगर शहरांत शोककळा पसरली आहे.