
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एका १६ वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चार आरोपींनी या मुलीला 'हुक्का' पार्टीसाठी नेले आणि नंतर मित्राच्या घरी नेले.शुक्रवारी तिचा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला असताना मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती दिवसभर अस्वस्थ होती. मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे, चार जणांवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.