कोरोनाच्या चौथ्या लाटेने पालक धास्तावले;दोन ते अकरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण नाही

जून २०२१ मध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणी नागपूर येथे घेण्यात आली.
कोरोनाच्या चौथ्या लाटेने पालक धास्तावले;दोन ते अकरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण नाही

जव्हार तालुक्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम तथा आदिवासी भागात जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यापासून, विद्यार्थी नियमितपणे शाळेत जाऊ लागले आहेत; परंतु अनेक दैनिकातील बातम्यांमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार म्हणून पालक आपल्या दोन ते अकरा वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी धास्तावले आहेत. आरोग्य विभागाकडून दोन ते अकरा वयोगटापर्यंतचे असणारे विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार कधी? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

तालुक्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल अजून तरी लागलेली नाही. कारण,विशेष म्हणजे लहान मुलांनाही आता कोरोना होत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली असून, २ ते ११ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर सध्यातरी प्रतिबंधक लस हाच पर्याय आहे. यामुळे १८ वर्षांवरील सर्वांना मोफत बूस्टर डोस दिला जात आहे. मार्च महिन्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना 'कोर्बेव्हॅक्स' लसही दिली जात आहे. मात्र, २ ते ११ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मध्यंतरी लहान मुलांसाठी लसीची चाचणी घेण्यात आली व ती प्रभावी ठरली. मात्र, यानंतरही लसीकरण सुरू झाले नसल्याने आता चौथी लाट बघता पालकांची चिंता वाढली आहे.

जून २०२१ मध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणी नागपूर येथे घेण्यात आली. यात कुठलाही दुष्परिणाम दिसून आला नाही. ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याने व अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण झाल्याचा अहवाल आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in