पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणाची फसवणूक; ९ लाख ६६ हजार रुपये लंपास

सायबर चोरट्यांनी या विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडीवर व कंपनीच्या नावाने तब्बल ९ लाख ६६ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.
पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणाची फसवणूक; ९ लाख ६६ हजार रुपये लंपास

नवी मुंबई : पार्ट टाइम जॉबद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला टास्क फ्रॉडमध्ये अडकवून त्याला वेगवेगळ्या युपीआय आयडीवर व कंपन्यांच्या नावावर तबल्ल ९ लाख ६६ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून त्याची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणूकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

२३ वर्षीय तरुण मूळचा तेलंगणा राज्यातील असून शिक्षणानिमत्त तो सध्या खारघर येथे मित्रासह राहण्यास आहे. गत मे महिन्यामध्ये या तरुणाला सायबर चोरट्यांनी टेलीग्रामवर एक लिंक पाठवून साईड बाय साईड त्यांच्यासोबत काम केल्यास त्याला चांगले पैसे मिळतील, असा मेसेज पाठवला होता. सायबर चोराने पाठवलेली लिंक विद्यार्थ्याने ओपन केली असता, व्हिडिओला लाईक केल्यानंतर त्याला डबल पैसे मिळतील अशी माहिती देण्यात आली. या अमिषाला बळी पडून सदर विद्यार्थ्याने पाच सहा कंपन्यांच्या नावाने ८० हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पाठवली. सदर विद्यार्थ्याने आणखी २० हजार रुपये पाठवले. त्यामुळे त्याने आणखी १० हजार रुपये पाठवून दिले. अशा पद्धतीने सायबर चोरट्यांनी या विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडीवर व कंपनीच्या नावाने तब्बल ९ लाख ६६ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in