लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक;२२ लाख ४० हजार लंपास

मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय पीडित मुलीसोबत आरोपी संतोष छारीची २०२१ मध्ये पीडितेसोबत ओळख झाली होती.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक;२२ लाख ४० हजार लंपास

भाईंंदर : मीरारोडमधील एका २२ वर्षीय पीडितेसोबत लग्न करतो, असे सांगून तिच्यावर २०२१ वर्षांपासून सातत्याने बलात्कार करून तिच्याकडून २२ लाख रुपये रोख आणि ४० हजारांची सोन्याची अंगठी घेऊन फसवणूक केल्याने बलात्कारसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय पीडित मुलीसोबत आरोपी संतोष छारीची २०२१ मध्ये पीडितेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर पीडितेसोबत जवळीक वाढल्याने आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून २०२१ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत २२ लाख रुपये आणि ४० हजाराची सोन्याची अंगठी घेऊन लग्न न करता तिची फसवणूक केली आहे. तसेच त्यानंतर पीडितेने 'जर तू मला सोडले तर, मी सुसाईड करून, तुला सर्वस्वी जबाबदार धरीन' व 'जर तू मला, भेटली अथवा दिसली नाही तर, तुझ्या अंगावर या ॲसिड टाकून जाळून टाकेन अशी धमकी दिली म्हणून आरोपीविरोधात बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, सदरील गुन्ह्याचा तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण बोडके हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in