मालवाहतूक बोगीला आग

या घटनेची माहिती मिळताच कर्जत अग्निशामक दल, खोपोली अग्निशामक दल, खालापूर एमआयडीसीचे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
मालवाहतूक बोगीला आग

कर्जत : कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावरील चौक रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या माल वाहतूक बोगीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने आग नियंत्रणात आल्याने मोठी वित्त आणि जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत, खोपोली आणि खालापूर एमआयडीसीमधील अग्निशामक दलाचे जवान वाहनासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणून मालगाडी कर्जतकडे रवाना केली. वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

मंगळवारी दुपारच्या सुमारास चौक रेल्वे स्थानकात डिझेल वाहतूक करणारी मालगाडी थांबली होती. ही पुण्याकडे जाणार होती. या मालगाडीच्या डिझेल भरलेल्या बोगीला गळती लागली होती. त्याच सुमारास तेथील कचऱ्याला आग लागल्याने ती आग गळती लागलेल्या डिझेलला देखील लागली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत अग्निशामक दल, खोपोली अग्निशामक दल, खालापूर एमआयडीसीचे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, त्यानंतर मालगाडी कर्जतकडे रवाना करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in