सरळगावातील गोवर्धन गॅस योजनेसाठी ५० लाखाचा निधी मंजूर

पाइपलाइनव्दारे येथील ग्रामस्थांना गॅसचे वितरण होणार असल्याचे सरळगावचे सरपंच मधुकर घुडे यांनी बोलताना सांगितले.
सरळगावातील गोवर्धन गॅस योजनेसाठी ५० लाखाचा निधी मंजूर

मुरबाड तालुक्याील सरळगांव बाजारपेठेत सरपंच मधुकर घुडे यांनी शासनाचे विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन केले असून आता ग्रामस्थांना नामपात्र किंमतीत गोवर्धन गॅस योजनेचा लाभ मिळणार आहे.

शासनाने गोवर्धन गॅस योजनेसाठी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. घनकचऱ्यापासून गोवर्धन गॅस तयार केला जाणार असुन पाइपलाइनव्दारे येथील ग्रामस्थांना गॅसचे वितरण होणार असल्याचे सरळगावचे सरपंच मधुकर घुडे यांनी बोलताना सांगितले.

ग्रामपंचायत स्तरावर राज्यातील पहिली योजना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २५ गुंठे जागेत हा प्रकल्प उभा राहत असून केंद्र आणि राज्याने निधी उपलब्ध करून दिला आहे.

५० गावांची बाजारपेठ असलेली सरळगांव ग्रामपंचायत दहा हजाराच्या आसपास आहे. सरळगांव ग्रामपंचायतमध्ये सगळ्यात मोठा आठवडा बाजार भरतो.

स्वतंत्र दवाखाना, बैलबाजार, स्वतंत्र पाणीपुरवठा असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये भव्य सभागृह, सौरउर्जेवर शेतकऱ्यांच्या शेताला पाणी. महिलांसाठी खास सुलभ शौचालय उभे करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

सरळगावामध्ये शासनाच्या जागेत एकमेव दुधडेअरी होती. त्यातून मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय मोठया झपाटयाने वाढवता आला. मात्र सध्या दुधडेअरी काही वर्षापासून बंद आहे त्याचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीवीकेवर झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in