मुरुड शहर व ग्रामीण विकासासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी प्रदान

विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड मधील विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न करताना केले
मुरुड शहर व ग्रामीण विकासासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी प्रदान

मुरुड शहराच्या व ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत ५५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुरुड तालुक्यावर आपले विशेष प्रेम असून विकासकामाला निधी उपलब्ध करून देण्यात आपण मागे पडणार नाही. शहराच्या विकासाचा आराखडा बनवा निधी प्राप्त करून देण्याची माझी जबाबदारी आहे. सुनील तटकरे मंत्री असताना सुद्धा एवढा निधी मुरुड तालुक्याचा विकासासाठी उपलब्ध झाला नव्हता त्यापेक्षा जास्त निधी मी आणला असून तालुक्यातील जास्तीती जास्त विकासकामे पूर्ण करण्याचा माझा मानस असल्याचे प्रतिपादन अलिबाग -मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड मधील विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न करताना केले आहे.

सदरील कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी -पंकज भुसे ,माजी नगराध्यक्षा -स्नेहा पाटील,नौसिन दरोग, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष -प्रमोद भायदे, सचिव -आदेश दांडेकर, प्रविण बैकर, माजी नगरसेविका -युगा ठाकुर,मेघाली पाटील , ऋषिकांत डोंगरीकर, शुभांगी करडे,माजी नगरसेवक संदिप पाटील, दिनेश मिणमिणे,मनोज कमाने,भाई सुर्वे,विजय पाटील,भरत बेलोसे, अशोक धुमाळ आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार दळवी आपल्या भाषणात म्हणाले की, मुरूड शहर हे कै.आनंद दिघे साहेबांची जन्मभूमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे यांचे ते गुरु आहेत.त्यामुळे मुरुडच्या विकासासाठी मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे निधी कमी पडून देणार नाहीत अशी ग्वाही सुद्धा यावेळी त्यांनी दिली. मुरुड-अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी दत्तमंदिर सुशोभीकरण व दत्त मंदिर रस्त्याचे भुमिपूजन करते समयी बोलत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in