भिवंडीत जुगार खेळविणारे विकतात नशेचे पदार्थ

शहरातील विविध ठिकाणी जुगार खेळविणारे नशेचे पदार्थ विकत असून, स्थानिक पोलीस नशा करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल कारवाई करीत आहेत
भिवंडीत जुगार खेळविणारे विकतात नशेचे पदार्थ

भिवंडी : शहरातील विविध ठिकाणी जुगार खेळविणारे नशेचे पदार्थ विकत असून, स्थानिक पोलीस नशा करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल कारवाई करीत आहेत; मात्र जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करीत नाही. शहरात असा व्यापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असून, जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केल्याचा फार्स केला जात असल्याचा आरोप दक्ष नागरिकांकडून केला जात आहे.

भिवंडी हे कामगारांचे शहर आहे. त्याचा गैरफायदा घेत येथील काही गुंड व कुख्यात लोक ठिकठिकाणी जुगाराचे अड्डे चालवून गोरगरीब नागरिक आणि कामगारांची लूटमार करीत आहेत. त्याचबरोबर त्यांना नशेच्या आहारी जाण्यासाठी त्याच परिसरात गांजा-चरसची विक्री केली जात आहे. मात्र पोलीस ठिकठिकाणी नशा करणाऱ्या कामगारांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. परंतु अशा नशेच्या पदार्थांच्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करीत नाही.

गेल्या जानेवारी महिन्यापासून सुमारे १०० ते १५० नशा करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, असे असताना जुगार चालविणाऱ्यावर कारवाई केलेली दिसून येत नाही. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा केली जात आहे. त्यातच हे जुगाराचे अड्डे आणि नशेचे पदार्थ विक्री करणारे शहरातील काही शाळेच्या मार्गावर असून, त्यांचे कृत्य विद्यार्थीवर्ग दररोज उभे राहून पाहत असतात. त्यामुळे विद्यार्थीवर्गावर परिणाम होण्याची भीती पालकवर्ग करीत आहेत. शहरात मागील काही महिन्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्कार व हत्या होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in