सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला भिवंडी पोलिसांकडून अटक

या दरोडेखोरांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे
सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला भिवंडी पोलिसांकडून अटक

भिवंडी : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोर टोळीला भिवंडीतील नारपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ईशान अब्दुल रेहमान शेख (४०), शहबान मोहम्मद सलीम शेख (३४), अहमद हुसेन सत्तार सावत उर्फ सलीम (४७), वजीर मोहम्मद हुसेन सावत उर्फ कान्या (३५), रेहान कब्बन सय्यद (२१), गुलामअली लालमोहम्मद खान (१९), हसन मेहंदी शेख (२६), सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी उर्फ सलीम हाकला (३९), प्रमोदकुमार बन्सबहादुर सिंग (४६) अशी अटक करण्यात आलेल्या ९ जणांची नावे असून हे सगळे मुंबईत राहणारे आहेत.

या दरोडेखोरांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,१३ डिसेंबर रोजी मानकोली येथील प्रभात केबल्स प्रा.लि. या वेअर हाऊसमध्ये अज्ञात १३ जणांनी टेम्पोमधून येवून सशस्त्र जबरीने कामगारांना मारहाण करीत दरोडा टाकून दरोडेखोर फरार झाले होते.

याप्रकरणी अज्ञातांवर नारपोली पोलीस ठाण्यात विकास हिंदूराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान व शहबाज या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अन्य ७ जणांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

logo
marathi.freepressjournal.in