Kalyan : कारागृहाबाहेर फटाके वाजवले; तिघांना अटक, एक फरार

कल्याण शहरातील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाके वाजविल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
Kalyan : कारागृहाबाहेर फटाके वाजवले; तिघांना अटक, एक फरार
Published on

कल्याण : कल्याण शहरातील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाके वाजविल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जगदाळे, क्षितीज भगत आणि आकाश खडसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर पोलिसांनी या तिघांची धिंड काढून इतरांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला.

उल्हासनगरातील कुख्यात आरोपी सतीश उर्फ 'सत्या भाई' कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही आतषबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in