विद्यार्थ्यांनी साकारला गौरवपूर्ण इतिहास

ज्युनिअर केजी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि सांगीतिक सादरीकरणातून भारतीय वैविध्यतेचे प्रदर्शन घडवले.
विद्यार्थ्यांनी साकारला गौरवपूर्ण इतिहास

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील सेंट थॉमस कॉन्व्हेंट हायस्कूलचा १५ वा वार्षिक सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. 'अतुल्य भारत' अशी थीम असणाऱ्या यंदाच्या या सोहळ्यात भारताचा गौरवपूर्ण इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन उपस्थित विद्यार्थी-पालकांना घडवण्यात आले.

ज्युनिअर केजी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि सांगीतिक सादरीकरणातून भारतीय वैविध्यतेचे प्रदर्शन घडवले. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा साकारल्यानंतर यंदाचे आकर्षण ठरले, ते 'गड आला पण सिंह गेला' हे तानाजी मालुसरे यांचे अतुलनीय पराक्रमनाट्य! रंगमंचावरील या नाट्याने मैदानावरील वातावरण भारावून गेले होते.

शाळेच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात २०२३ मध्ये सर्वाधिक गुणांनी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. शाळेचे प्राचार्य डॉ. हेमंत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर, शाळेचे विश्वस्त, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी हजर होते.

logo
marathi.freepressjournal.in