गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाची वैभवशाली कामगिरी -जितेंद्र मेहता: प्रदर्शनास ३० हजार २१७ जणांची भेट; २१७ जणांची घरखरेदी, १२५० कोटींचे गृहकर्ज वाटप

ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून, प्रॉपर्टी प्रदर्शनाने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदविली.
गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाची वैभवशाली कामगिरी -जितेंद्र मेहता: प्रदर्शनास ३० हजार २१७ जणांची भेट; २१७ जणांची घरखरेदी, १२५० कोटींचे गृहकर्ज वाटप

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रासह ठाण्यातील रिअल इस्टेट विश्वात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या ‘क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदविली आहे. याबद्दल ‘क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनाला यंदा तब्बल ३० हजार २१७ जणांनी भेट दिली. तर २१७ कुटुंबांचे ठाणे शहरात घराचे स्वप्न साकार झाले. तर विविध बँका व वित्त संस्थांकडून सुमारे एक हजार २५० कोटींहून अधिक कर्जाचे वाटप करण्यात आले.

‘क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या वतीने पोखरण रोड क्र. १वरील रेमंड मैदानावर १६ फेब्रुवारीपासून चार दिवसांचे ‘गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४’ भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदर्शनात सहभाग घेण्यात आला. त्यात ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी १०० हून अधिक गृह प्रकल्प व व्यावसायिक प्रकल्प सादर केले होते, तर कर्जपुरवठा करण्यासाठी १५ हून अधिक बँका व वित्त संस्थांनी सहभाग नोंदविला.

ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून, प्रॉपर्टी प्रदर्शनाने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदविली. ठाणे शहरात वास्तव्यासाठी शेकडो नागरिकांनी पसंती दिली, याबद्दल ‘क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या यशस्विततेसाठी क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे पदाधिकारी, आयोजक समिती आणि सदस्यांनी नियोजन केले होते, अशा शब्दांत अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in