वाहतूक सुरक्षेसाठी ठाण्यात ग्रीन सिग्नल यंत्रणा; तीनहात नाका येथे प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा बसवणार

ठाणे शहरामध्ये १५ जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून हे अभियान पुढील एक महिना कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे.
वाहतूक सुरक्षेसाठी ठाण्यात ग्रीन सिग्नल यंत्रणा; तीनहात नाका येथे प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा बसवणार

ठाणे : ठाण्यातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीनहात नाका परिसरात वाहतूक सुरक्षेसाठी तसेच दृष्टिहीनांसाठी ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला तीनहात नाका या ठिकाणी एकूण ७ रस्ते एकत्र मिळत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणाचा प्रत्यक्ष अभ्यास व सर्वेक्षण करून या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठाण्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे शहरामध्ये १५ जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून हे अभियान पुढील एक महिना कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी १४ लाख ८२ हजार खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा "रस्ते नूतनीकरण" या शिर्षकाअंतर्गत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

त्यामुळे ही ग्रीन सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसोबतच जे दृष्टिहीन आहेत त्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. मोहिम वाहतूक विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यांवरील चौकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरीता ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणे, विशेष करून दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना सिग्नलवर रस्ता ओलांडणे सुलभ, सुरक्षित व्हावे, याबाबत सदर सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्या अनुषंगाने याबाबतीत शहर वाहतूक शाखा तसेच ठाणे महानगरपालिका मिळून एकत्रपणे ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी आहे ग्रीन सिग्नल यंत्रणा

ग्रीन सिग्नल यंत्रणा ही विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा असते. यामध्ये अनेक कामांचा समावेश करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणामध्ये सुधारणा करणे, बिपरची व्यवस्था करणे, दृष्टिहीन व्यक्तींना पायाच्या स्पर्शाने अथवा हातामधील काढीने मार्ग समजण्यासाठी दृष्टिहीनांकरिता जगभर वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या टाइल्स बसविणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in