बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेत अभिवादन करण्यात आले.

महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, महापालिका उप सचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in