उरण बाजारात मिनी गुढ्या दाखल

यंदा येत्या मंगळवारी म्हणजेच ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा मंगळवारी असल्याने उरण बाजारात ठीकठिकाणी मिनी गुढ्या विकावयास आल्या असून नागरिक त्या खरेदी करण्यास नागरिकांची लगबग सुरू आहे.
उरण बाजारात मिनी गुढ्या दाखल

उरण : गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक, उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, पाला , फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर - धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. याच गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होते.

यंदा येत्या मंगळवारी म्हणजेच ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा मंगळवारी असल्याने उरण बाजारात ठीकठिकाणी मिनी गुढ्या विकावयास आल्या असून नागरिक त्या खरेदी करण्यास नागरिकांची लगबग सुरू आहे. धावपळीच्या युगात साहित्याची जमवाजमव करून गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. लहानात लहान ६ इंच असून दोन फूटपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. साधारण ८०, १२०, १४०, २०० ते २५० रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढ्या बाजारात उपलब्ध असल्याचे हरीलाल जनरल स्टोअर्सचे मालक यश मेहता यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in