चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून महिलेचे २९ हजार लांबवले

एका ६५ वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून दोन अज्ञातांनी तिच्याकडील रोख रकमेची अदलाबदल करून महिलेचे २९ हजार लांबवल्याची घटना समोर आली आहे.
चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून महिलेचे २९ हजार लांबवले

भिवंडी : एका ६५ वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून दोन अज्ञातांनी तिच्याकडील रोख रकमेची अदलाबदल करून महिलेचे २९ हजार लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ फेब्रुवारी रोजी सालीयाबानो मो.हसन शहा (६५) ही महिला पंजाब नॅशनल बँकेतून २९ हजारांची रक्कम काढून कल्याण नाका ते धामणकर नाका हद्दीतील गोल्डन हॉस्पिटल जवळील वॉटर प्युरिफायरच्या तनिष्क इंटरप्रायझेस या दुकानाजवळ उभी होती. त्यावेळी दोन अज्ञात त्या महिलेवर पाळत ठेवून होते. दरम्यान, अज्ञातांनी महिलेजवळ येऊन गुंगीची पावडर फुंकली. त्यावेळी महिलेला चक्कर आल्यासारखे वाटू लागल्याने अज्ञातांनी तिच्याकडील सर्व रोख रक्कम हात चलाखीने चोरून त्या जागी नोटांच्या आकाराचे कागद रुमालात गुंडाळून महिलेला लुटले आहे. सदर बाब लक्षात येताच सालीयाबानोने शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञातांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञातांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोऊनि कोलते करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in