काशीमीरा मधून १६ लाखांचा गुटखा जप्त

मीरा-भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना मीरारोड भागात गुटख्याचा साठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
काशीमीरा मधून १६ लाखांचा गुटखा जप्त
Published on

भाईंदर : मीरारोड मध्ये विक्रीसाठी आणला जाणाऱ्या १६ लाखांचा गुटख्याचा साठा पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गवरील वरसावे भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी गुटख्याच्या साठ्यासह टेम्पो जात करत चालकास अटक केली आहे. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा गुजरात आदी भागातून महाराष्ट्रात आणून सर्रास विक्री केला जात आहे. मीरा-भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना मीरारोड भागात गुटख्याचा साठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर रोजी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वरसावे येथे अनुहा लॉज समोर पोलीस पथकाने माहितीच्या आधारे टेम्पो क्र. एमएच ४८ सीबी २८५३ हा पोलीस पथकाने अडवला. टेम्पोत तपासणी केली असता गोण्यां मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूयुक्त गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी टेम्पो व गुटख्याचा साठा असा १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचा चालक  विलास गोविंद पवार ( ३८ ) रा. शास्त्रीधर पाडा, कामण मार्ग याला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in