उल्हासनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीवर फटका

सव्वा लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व निवडणूक विभागप्रमुख मनीष हिवरे यांनी सांगितले.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीवर फटका

महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात २०११मधील जनगणेनेनुसार समाविष्ट असलेल्या ५ लाखाच्या वरील मतदारांची संख्या ही पावणेचार लाखाच्या घरात आल्याचे उघड झाले आहे. मुख्यतः उल्हासनगरातील उद्योगधंदे बंद झाल्याने आणि त्यामुळे नागरिकांनी इतरत्र स्थलांतर केल्याने त्याचा फटका मतदारांच्या यादीवर देखील झाला असून त्यामुळे सव्वा लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व निवडणूक विभागप्रमुख मनीष हिवरे यांनी सांगितले.

२०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणेनेनुसार उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा निहाय शहराची लोकसंख्या ही ५ लाख ६ हजार ९८ होती. २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार ७०२ मतदार राहिले आहेत. त्यात २ लाख २ हजार ५४७ पुरुष,१ लाख ७१ हजार ८० महिला आणि ७५ तृतीयपंथी यांचा समावेश आहे. पूर्वी २० प्रभाग होते. त्यातून ७८ नगरसेवक निवडून येत होते. आता ३० प्रभाग करण्यात आले आहेत. त्यातून ८९ नगरसेवक निवडून येणार असून ११ नगरसेवकांची वाढ होणार आहे.

या ३० प्रभागात २९ प्रभाग हे तीन सदस्यीय व १ प्रभाग हा दोन सदस्यीय असणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in