ठाण्यात गृह उत्सव!

या प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार असून, घर घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मेहता यांनी केले.
ठाण्यात गृह उत्सव!

ठाणे : देशाची अर्थव्यवस्था २०२३ पासून गतिमान झाली असल्यामुळे, ठाणे येथील रेमंड मैदानावर १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४-ठाणे प्रदर्शनाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रतिसादाचे रूपांतर काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांच्या विक्रीमध्ये होईल, असा विश्वास 'क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार असून, घर घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मेहता यांनी केले.

गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४, ठाणे प्रदर्शनाच्या माध्यमातून घर शोधणाऱ्या कुटुंबांना आपल्या बजेटनुसार घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनात ठाणे शहराच्या विविध भागातील परवडणाऱ्या घरांपासून सर्व सुविधांयुक्त प्रशस्त व उच्चभ्रू जीवनशैली असलेली घरे ग्राहकांना उपलब्ध होतील. त्यात शहरातील मध्यवर्ती भागासह निसर्गसंपन्न भागातील घरांचा समावेश आहे. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहराला समृद्ध व संपन्न इतिहास आहे. सध्या शहरात विविध सुविधा उपलब्ध असून, शांत व सुरक्षित वातावरणात निवासासाठी ठाणे शहराची राज्यात ‘रिटेल हब’ म्हणून ओळख झाली आहे. तर विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे संस्थेने आयोजित केलेला गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४ मधून ग्राहकांना सुरक्षित व माफक दराने गृहकर्जाद्वारे घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, असे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले.

आभासी पद्धतीने हेलिकॉप्टर सैर!

क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या गृह उत्सव-प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनात ग्राहकांना गृह खरेदीसाठी प्रकल्प पाहतानाच, ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकॉप्टर सैर करता येणार आहे. या प्रदर्शनातील व्ही. आर. कंपनीच्या स्टॉलवर ग्राहकांसाठी ही पर्वणी उपलब्ध असेल. गृह उत्सव-प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी आवर्जून ठाणे शहराचा आभासी अविस्मरणीय प्रवास करावा, असे आवाहन क्रेडाई एमसीएचआय, ठाणे आणि व्ही. आर. कंपनीने केले आहे.

२१ वे भव्य प्रदर्शन

ठाणे शहरातील पोखरण रोड क्र. १ वरील रेमंड मैदानावर येत्या १६ फेब्रुवारी रोजी भव्य प्रदर्शनाला सुरुवात होणार असून, ते १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला मोफत प्रवेश देण्यात येईल, असे आवाहन मेहता यांनी केले. ठाणे येथे होणारे क्रेडाई-एमसीएचआयचे २१ वे भव्य प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य नियोजन करीत आहोत, असे 'क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले.

ठाणे शहराच्या पुनर्विकासावर परिसंवाद

क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे यांच्यातर्फे रेमंड मैदानावर होणाऱ्या गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शनात १८ फेब्रुवारी रोजी ‘ठाणे शहराचा पुनर्विकास’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या परिसंवादात 'ॲम्बियन्स डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड'चे अध्यक्ष व वास्तुविशारद मकरंद तोरसकर, 'साकार आर्किटेक्ट'चे वास्तुविशारद मकरंद पारंगे, ॲंड. प्रसन्न माटे आणि ठाणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होत आहे. या उद्घाटनानिमित्ताने एमसीएचआय-क्रेडाई प्रदर्शनाच्या २१ व्या पर्वाला सुरुवात होत असून, पहिल्या प्रदर्शनापासून आयोजक होण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी म्हटले आहे. ठाण्यात झालेल्या पहिल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला धर्मवीर दिवंगत आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांची एकत्र उपस्थिती होती.

गृह उत्सवाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

ठाणे शहरातील १०० हून अधिक गृहप्रकल्प

५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

१५ हून अधिक बँका व गृहकर्ज वित्तीय संस्था

घर खरेदीसाठी २० हजारांहून अधिक कुटुंबे प्रदर्शनाला भेट देणार

घराचे स्वप्न सहजपणे साकार करणारे गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४-ठाणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in