डोंबिवलीत रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

पर्समध्ये एक तोळ्याचा कानातील सोन्याचा दागिना सापडला, आठ हजार रोख रक्कम आणि आधार कार्ड होते.
डोंबिवलीत रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

डोंबिवली : महिला प्रवाशाची रिक्षात विसरलेली पर्स परत करून रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखविला. या पर्समध्ये एक तोळ्याचा कानातील सोन्याचा दागिना सापडला, आठ हजार रोख रक्कम आणि आधार कार्ड होते.

बुधवारी सायंकाळ आठ वाजता पूर्वेकडील सागर्ली रिक्षा स्टँड येथील रिक्षाचालक बुवा काका यांना त्यांच्या रिक्षामध्ये महिला प्रवाशाची पर्स सापडली होती. रिक्षाचालक बुवा यांनी याबाबत मनसेचे शहर संघटक हरीश पाटील यांच्याशी संपर्क केला. पाटील यांनी पर्समधील आधार कार्डवरील पत्त्यावरून डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या सुप्रिया खोरे यांच्याशी संपर्क साधला. पाटील व मनसैनिकांनी घरी जाऊन खोरे यांना दागिने व रोख रक्कम परत केली. मनसेने प्रामाणिक रिक्षा चालक बुवा यांचे अभिनंदन करून त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग २४ च्या वतीने सत्कार करणार असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in