ठाण्यात आज ‘गृहनिर्माण संस्थेचे महाअधिवेशन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती

गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी दि. २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानातील भव्य मंडपात 'गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन' व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ठाण्यात आज ‘गृहनिर्माण संस्थेचे महाअधिवेशन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती
Published on

ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी दि. २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानातील भव्य मंडपात 'गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन' व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी आमदार संजय केळकर आणि आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.

ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आ. गणेश नाईक, आ. प्रताप सरनाईक, खा. नरेश म्हस्के, आ. रवींद्र चव्हाण तसेच, सहकार मंत्री, गृहनिर्माण मंत्री आदींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तीन दिवसांत सुमारे ३० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार असून यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

अनेक संस्थांचे स्टॉल्स

अधिवेशनामधील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स देखील असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in