रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने आमरण उपोषण

बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना उच्च न्यायालयाने २३ वर्षांपूर्वी आदेशित करूनही महापालिकेने अद्यापही पुनर्वसन दिलेले नाही
रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने आमरण उपोषण
Published on

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले असून हे रस्ता रुंदीकरण करताना अनेक घरे, दुकाने बाधित झाली आहेत; मात्र या बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने जागरूक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बाजारपेठ रस्ता रुंदीकरणांतील बंधितांसाठी जागरूक नागरिक फाऊंडेशनचे श्रीनिवास घाणेकर आणि दक्षता पोलीस चौकी ते वनश्री सृष्टी रस्ता रुंदीकरणांमध्ये दुकान बाधित राम बनसोडे आणि इतर बाधित केडीएमसी मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना उच्च न्यायालयाने २३ वर्षांपूर्वी आदेशित करूनही महापालिकेने अद्यापही पुनर्वसन दिलेले नाही. तसेच तत्कालीन महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे व विद्यमान आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांना विविध विषयावर ३७ पत्र देऊन सुद्धा महापालिका त्यावर कोणतीही सकारात्मक भूमिका घेत नाही. डिसेंबर २०२२ मध्ये जागरूक नागरिक फाऊंडेशनने उपस्थित केलेल्या नऊ जनहितार्थ मुद्द्यावर महापालिकेने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही कोणतीही अंमलबजावणी केली नाही. याचा निषेध म्हणून तसे या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत जागरूक नागरिक फाऊंडेशनचे कार्यकर्ते सोमवारपासून महापालिकेच्या भवना बाहेरच्या पदपथावर आमरण उपोषणास बसले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in