चेक बाउन्स झाले तर पालिका कारवाई करणार

मालमत्ता धारकांनी दिलेले चेक बाउन्स झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
चेक बाउन्स झाले तर पालिका कारवाई करणार

भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी अनेक मालमत्ता धारक चेक देतात. परंतु चेक दिल्यानंतर हे चेक बाउन्स होतात. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होते. मालमत्ता धारकांनी दिलेले चेक बाउन्स झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मीरा- भाईंदर शहरातील मालमत्ता धारक हे ऑनलाईन, नगद व चेकद्वारे मालमत्ता कर भरतात. मालमत्ता कर वसुली करण्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत. मीरा -भाईंदर महापालिकेने यावर्षी मालमत्ता कराचे २३६ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. परंतु अद्यापपर्यंत १५० कोटीची वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ८२ कोटी वसूल करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता थकबाकी धाराकांविरोधात कारवाई निर्णय घेतला आहे. महापालिकेने १९४ थकबाकी धाराकांना जप्तीच्या नोटिसा पाठवल्या असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. महापालिकेला गेल्या नऊ महिन्यांत १ एप्रिल २०२३ ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत ६४५ मालमत्ता धारकांनी दिलेले चेक बाउन्स झाले आहेत. महापालिकेने या थकबाकी धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यापैकी अद्यापही १९३ मालमत्ता थकबाकी धारक ती रक्कम भरत नाहीत त्याची रक्कम ७४ लाख रुपयांची आहे. त्यामुळे चेक बाउन्स करणाऱ्या मालमत्ता थकबाकी धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

मालमत्ता कर भरलेल्या १९३ मालमत्ता धारकांचे चेक बाउन्स झालेले आहेत. त्यामुळे या थकबाकीदारांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, तसे परिपत्रक सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

- चंद्रकांत बोरसे, कर विभाग प्रमुख

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in