बदलापूर : घरातच एमडी बनविण्याची प्रयोगशाळा; केमिकल इंजिनिअरसह दोघांना अटक

बदलापूर पूर्वेकडील मानकिवली परिसरात घरातच एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी प्रयोगशाळा उभारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बदलापूर : घरातच एमडी बनविण्याची प्रयोगशाळा; केमिकल इंजिनिअरसह दोघांना अटक
बदलापूर : घरातच एमडी बनविण्याची प्रयोगशाळा; केमिकल इंजिनिअरसह दोघांना अटक'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

बदलापूर : बदलापूर पूर्वेकडील मानकिवली परिसरात घरातच एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी प्रयोगशाळा उभारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केमिकल इंजिनिअरसह दोघांना अटक केली असून, ११ ग्रॅम एमडीसह एकूण २ लाख १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानकिवली गावातील एका चाळीतील घरात एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रसायने आणि अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कोकण सुरजु पहान (४२) आणि संतोष वसंत पोतनीस (५४) यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही माहिती दिली. अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेला संतोष पोतनीस हा केमिकल इंजिनिअर असून, यापूर्वी घाटकोपर येथील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान बदलापूर ग्रामीण हद्दीतील त्याची प्रयोगशाळा जप्त करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in