कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले.
कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर
Published on

वसई : मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन हे महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण हे ५७.४९ टक्के एवढे आहे. यंदा दीड दिवसांचे (५८.३९ टक्के), पाच दिवसांचे (६६.३४ टक्के) आणि गौरी-गणपती (५८.१८ टक्के) आदी विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले.

कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांनी सातव्या दिवशीही प्रतिसाद दिला. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन (५७.४९ टक्के) कृत्रिम तलावात झाले. यंदा महापालिकेकडून विसर्जनासाठी सर्वाधिक म्हणजे १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in