उल्हासनगरात भीषण अपघातात; तिघांचा मृत्यू

लग्नसमारंभावरून उल्हासनगरच्या दिशेने येत असलेल्या एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली.
उल्हासनगरात भीषण अपघातात; तिघांचा मृत्यू
PM

उल्हासनगर : लग्नसमारंभावरून उल्हासनगरच्या दिशेने येत असलेल्या एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण-बदलापूर रस्त्यावर असलेल्या शांतीनगर येथे दारूच्या नशेत असलेल्या एका वाहनचालकाने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोमुदीप जाना, अंजली जाना, शंभूराम चव्हाण या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी लवेश राजानी या वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे वाहन चालवणारा तरुण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या गाडीचा पंचनामा केला असता त्यात दारूची बाटली तसेच इतर वस्तू आढळून आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in