ऐन गणेशोत्सवात ठाण्यात विजेचा लपंडाव, खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी त्रस्त

ऐन गणेशोत्सवात ठाण्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात असून महावितरणच्या या कारभाराविषयी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ऐन गणेशोत्सवात ठाण्यात विजेचा लपंडाव, खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी त्रस्त
Published on

ठाणे : ऐन गणेशोत्सवात ठाण्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात असून महावितरणच्या या कारभाराविषयी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांसोबतच ठाण्यातील व्यापारी आणि दुकानदार अतिशय त्रस्त झाले आहेत. शहरातील शिवाई नगर, शास्त्री नगर, म्हाडा, वसंत विहार, लोकपुरम आणि वागळे इस्टेट येथील काही भागात दररोज वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना खंडित होण्याची नवी समस्या

शहरातील वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे, कचरा अशा समस्यांनी ठाणेकर आधीच त्रस्त असताना आता ऐन गणेशोत्सवात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहरी भागातील वीजपुरवठा वारंवार उद्भवल्याने नागरिकांचा जीव जेरीस आला आहे. उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या पोखरण रोड येथे वसंत विहार परिसरात अनेक

छोटी-मोठी दुकाने, दवाखाने, कोचिंग क्लासेस त्याचबरोबर रहिवासी इमारती आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे दुकानदार, विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी देखील अडचणी येतात त्यामुळे पालक आणि कोचिंग क्लासेस चालकांनी देखील महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

सध्या पाऊस आणि ऊन अशी स्थिती असल्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतर थंडावाऐवजी नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. त्यातच अचानक वीज गेल्यानंतर विजेवरची उपकरणे खराब होण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात विजेचा पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तोडगा काढण्याची मागणी

सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. दुकानांमध्ये गणेशोत्सवानिमित्त सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दुकानदारांनी ठेवले आहे. नागरिक देखील घरात गणेशोत्सवाची तयारी करत आहेत. मात्र दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा हिरमोड होत असून यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी ठाणेकर असलेले शुभम पाटील यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in