उरण तालुक्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा

रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी न झाल्याने त्यावर खड्डयांचे प्रमाण अधिक वाढल्याचे नागरिकांनी म्हटले आहे
उरण तालुक्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा
Published on

उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा होत असल्यामुळे नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. उरण तालुक्यात प्रामुख्याने ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते त्याच ठिकाणी अधिक प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात केबल, पाईपलाईन यासाठी रस्ते खोदण्यात आले होते, मात्र त्यानंतर खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी न झाल्याने त्यावर खड्डयांचे प्रमाण अधिक वाढल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांबाबत सर्व प्राधिकरणांना ताबडतोब खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र उरण तालुक्यातील खड्ड्यांकडे कुठल्याही प्राधिकरणाने लक्ष न दिल्यामुळे खड्डयांच्या त्रासाला नागिरकांना सामोरे जावे लागत आहे. उरण तालुक्यातील नवघर ते बोकडविरा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in