प्रगत शिवण कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यभरात शासन आपल्या दारी हा उपक्रम सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने अनेक योजना सुलभपणे
प्रगत शिवण कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

जव्हार सारख्या अतिदुर्गम भागात शिक्षण रोजगार आणि आरोग्य यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत त्यामुळे या ठिकाणी खरीप हंगामातील शेती हे उदरनिर्वाहाचे साधन आहे परंतु हा हंगाम संपल्यानंतर येथील नागरिक आपापल्या कुटुंबाच्या लालन पालनाकरिता शहराची वाट धरू लागतो, परिणामी या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा मुलांच्या शिक्षणाचा मोठी समस्या भेडसावते. पुरुषांनी काम करून महिलांनी घर सांभाळणे अशी साधारण मानसिकता असणाऱ्या या भागामध्ये बदल व्हावयाकरिता अजंता ऍग्रो मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली त्यादृष्टीने गणेश नगर व शहरातील हनुमान पॉईंट परिसरात प्रगत शिवणकामाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी बारा वाजता उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पालघर खासदार राजेंद्र गावित पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, संत रोहिदास चर्मकार आयोगाचे कॅप्टन विनीत मुकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रगत शिवण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अजंता ॲग्रो मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने नियोजित करण्यात आलेल्या सर्व रोजगारभिमुख योजनांची तोंड भरून स्तुती केली शिवाय येथील महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याने कुटुंबाचा दर्जा सुधारेल आणि शिक्षण आरोग्य सारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील कला संस्कृतीचे जतन करून या संस्कृतीला वाव मिळण्यासाठी अजंता कडून प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन केले.

सध्या संपूर्ण राज्यभरात शासन आपल्या दारी हा उपक्रम सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने अनेक योजना सुलभपणे मिळत आहेत शिवाय जवळपास 45 लाख रोजगार विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाले. राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे राज्यभरात जवळपास 700 पेक्षा अधिक आपला दवाखाना उपक्रम जोमाने सुरू आहे , त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील आर्थिक रकमेची वृद्धी करून पाच लाख रुपयापर्यंत केल्याने सध्याचे सरकार हे सामान्य नागरिकांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणारे असल्याचे सांगितले, शिवाय महिलांसाठी 50 टक्के प्रवास भाड्यात सूट तर 75 वर्ष वरील वृद्धांना मोफत एसटीचा प्रवास असे अनेक उपक्रम शिंदे सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आल्याचे खासदार शिंदे यांनी विशेष नमूद केले.

पालघर जिल्हा खासदार राजेंद्र गावित यांनी बोलताना सांगितले की अजंता ऍग्रो च्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक रोजगार उपलब्ध करून महिला तसेच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाईल, लवकरच १ हजार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येईल, तसेच ग्रामीण भागातील तालुक्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रत्येकी ५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असे आश्वासित केले, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण आहे परंतु अशा परिस्थितीत देखील उपलब्ध मनुष्यबळात चांगले काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे मनरेगा सारखी योजना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबवली जात असून राज्यात प्रथम क्रमांकावर काम करीत आहे.जिल्ह्यात रिक्त पदांचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन दोन्ही खासदारांकडे करण्यात आले.

संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांनी जव्हार तालुक्यातील पर्यटन बहरल्यास येथे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल आणि डहाणू नाशिक रेल्वेची उपलब्धि झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन विकास नांदेल अशी आग्रही मागणी खासदार श्रीकांत शिंदे व खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे केली असून दोन्ही खासदारांनी याबाबत सकारात्मकता दाखवली.

यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या वैदेही वाढान, मोखाडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले उपसभापती प्रदीप वाघ,शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे,राजेश शहा, वसंत चव्हाण तसेच पोलीस पाटील, महिला वर्ग, अजंता ऍग्रो चे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद भोईर तर प्रस्तावना अजित घोसाळकर व भावना पवार यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in