मनपातर्फे आरोग्यवर्धिनीचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा सर्व उल्हासनगर महानगरपालिकेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.
मनपातर्फे आरोग्यवर्धिनीचे उद्घाटन

उल्हासनगर : उल्हासनगर मनपा कार्यक्षेत्रातील वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आपला दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनीचे उद्घाटन मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

उल्हासनगर मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र -३ अंतर्गत राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांना त्वरित व स्वस्त आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, सुभाषनगर उल्हासनगर ३, व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र- ९ कुर्ला कॅम्प उल्हासनगर ४ यांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विद्या चव्हाण, शहर लेखा व्यवस्थापक दिनेश सरोदे, तसेच सर्व नागरी प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आपला दवाखानाची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असून नागरिकांना याचा लाभ घेता येणार असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा सर्व उल्हासनगर महानगरपालिकेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in