१२ जानेवारीला उपवन घाटाचे लोकार्पण; प्रताप सरनाईक, आयुक्तांनी केली पाहणी

उपवन घाटाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे.
१२ जानेवारीला उपवन घाटाचे लोकार्पण; प्रताप सरनाईक, आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे : येऊरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे.

उपवन तलावामध्ये होत असलेल्या म्युझिकल फाउंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिले म्युझिकल फाउंटन असून, या म्युझिकल फाउंटनच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्रद्वारे पाच मिनिटाचा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्रद्वारे पाच मिनिटांचा देखावा ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफीत मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये दररोज सायंकाळी ७,८,९ वाजता ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या म्युझिकल फाउंटन व सुशोभीकरणासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी रुपये दहा कोटींहून अधिक रक्कम दिली असून, ओवळा- माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून म्युझिकल फाउंटन उभारले जाणार आहे; पण तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाउंटन व उपवन घाटाचा आनंद उपभोक्ता येणार आहे.

१२ जानेवारी रोजी होणाऱ्या उपवन घाट व म्युझिकल फाउंटनच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक व ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी १० जानेवारी रोजी उपवन येथे येऊन पाहणी केली. त्यावेळी या म्युझिकल फाउंटनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफीत दाखवण्यात आली. या चित्रफित प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेली असून, लाईट अँड शेडचे संस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी त्यांना चांगली साथ दिलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in