शिक्षकांना कामाला जुंपणे चुकीचे; ॲड. असीम सरोदे यांचे मत

शिवजयंतीनिमित्त इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवस्वराज्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते व्याख्याते म्हणून हजर राहिले
शिक्षकांना कामाला जुंपणे चुकीचे; ॲड. असीम सरोदे यांचे मत

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामात शिक्षकांना जुंपू नये असे ठणकावून सांगितले. तसेच मत ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. याकामासाठी पदवीधर असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन तात्पुरता कामकाजासाठी त्यांना घेण्यात आले पाहिजे, असेही असोदे म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त ॲड. सरोदे हे डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे एका कार्यक्रमाला आले होते. शिवजयंतीनिमित्त इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवस्वराज्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते व्याख्याते म्हणून हजर राहिले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने एक वेगळी टीम तयार करायला हवी होती. आयोगानेच एक नोटिफिकेशन काढले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे शिक्षकांचा आणि लहान मुलांचा वापर निवडणुकीच्या कामासाठी करू नये. या पार्श्वभूमीवर त्यांचाही गैरवापर होऊ नये यासाठी स्वायत्त तीन निवडणूक आयोगाने तयार करणे गरजेचे होते. तिच्या कामासाठी पदवीधर असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन तात्पुरता कामकाजासाठी त्यांना घेण्यात आले पाहिजे. कुणाला तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण पगार मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in