
पावसाळ्यात डोकेदुखी, ताप, सर्दी व घशाला होणारे त्रास हे हवामान बदलाचे आजार असून संसर्गाचे विषाणू हवेत आल्याने आजारात वाढ झाली आहे. डॉक्टरांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
घरात काम करणाऱ्या महिला असोत की, शाळेत जाणारी मुले यांना ही लक्षणे दिसून येतात. वसईत अलिकडे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला हे किरकोळ आजार देखील रुग्णांना कमजोर करीत आहेत. रुग्णालयात व खासगी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा वाढत आहेत.
अलिकडे विषाणू जन्य हे आजार असले तरी मोठे डॉक्टर खर्चिक उपचार करायला लावतात. रुग्णालयात दाखल करुन घेतात तर काही डॉक्टरकडे जाऊन केलेल्या उपचारानेही रुग्ण बरे होत आहेत. मात्र असे असले तरी घाबरुन न जाता काही खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.