कर्जत नगरपरिषद क्षेत्राची पावसाळ्यापूर्वी पहाणी सुरु

नगरसेवकांनी कर्जत शहरातील नगरपरिषद क्षेत्रातील नालेसफाई झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती
कर्जत नगरपरिषद क्षेत्राची पावसाळ्यापूर्वी पहाणी सुरु

कर्जतमध्ये अजून पावसाला सुरूवात झाली नसल्यामुळे कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य नाले, छोटे-मोठी गटारे साफसफाई झाली की नाही ? याची पाहणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केली व संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत काही सूचना केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये काही नगरसेवकांनी कर्जत शहरातील नगरपरिषद क्षेत्रातील नालेसफाई झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनासोबत घेऊन कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील काही परिसरातील नाले, गटारे, पाणी भरणाऱ्या परिसराची पाहणी केली व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विशेष सूचना केल्या आहेत.

कर्जत नगरपरिषद परिसरातील बामचा मळा, इंदिरानगर, दहिवली, मुद्रे, भैरवनाथ नगर, कोतवाल नगर, विठ्ठलनगर, महावीर पेठ, बाजार पेठ, हनुमान मंदिर परिसर पाटील आळी, भिसेगाव, गुंडगे व इतर सर्व प्रभागातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्याऐवजी पावसाळ्यापूर्वी डांबराचे पॅचेस मारले जात आहेत ते योग्य पध्द्तीने भरले जात आहे की नाही तसेच नालेसफाई, पावसाच्या पाण्यासाठी चर मारणे, इतर कामांची पाहणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केली. यावेळी नगराध्यक्षांनी इतर कामांची पाहणी करून उर्वरीत कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश िदले आहेत.

याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका भारती पालकर, नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, तसेच संबंधित कामांचे ठेकेदार व त्या प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in