पालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आयुक्तांकडून पाहणी

उल्हासनगर -१ येथील उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उदघाट्न एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज होणार
पालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आयुक्तांकडून पाहणी

उल्हासनगर : उल्हासनगर -१ येथील उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उदघाट्न एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज होणार आहे. त्याउद्देशाने सदर रुग्णालयाची पाहणी रविवारी महापालिका प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), अरुण आशान व दिलीप गायकवाड यांच्या समवेत करण्यात आली.

यावेळी महापालिका उप-आयुक्त सुभाष जाधव, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, उद्यान अधिकारी दीप्ती पवार, सिस्टीम अनॅलिस्ट श्रद्धा बाविस्कर, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in