अग्निशस्त्र विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकाला अटक; भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची कारवाई

भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने तपास करून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यात अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या आंतर राज्यीय टोळीतील एका सराईताला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने तपास करून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यात अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या आंतर राज्यीय टोळीतील एका सराईताला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. गुरुचरण छबिलासिंग जुनेजा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत अवैधरीत्या अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने अवैधपणे अग्निशस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत भिवंडी गुन्हे शाखा घटक-२चे वपोनि सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यानंतर नुकतेच २३ फेब्रुवारी रोजी गायकवाड यांना भिवंडीतील मानकोली येथील पेट्रोल पंपासमोर आरोपी गुरुचरण हा अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगार गुरुचरण यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in