भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विधी विभागात सहाय्यक विधी अधिकारी या तीन पदाच्या जागा भरण्यासाठी मुलाखती स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) येथे १८ जानेवारी रोजी घेण्यात आल्या.
त्यात मुलाखत देणाऱ्यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण, मुंबई यांच्याकडील अधिकृत एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. सदर मुलाखती या पालिका अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त मारुती गायकवाड, मुख्य लेखा परीक्षक सुधीर नाकाडी, विधी अधिकारी सई वडके आणि शहर अभियंता दिपक खांबीत यांनी मुलाखती घेतल्या त्यात दोन मुलं आणि तीन मुली होत्या. गुण व शैक्षणिक कागदपत्रांवरून निवड झालेल्यांना उमेदवारांना ४० हजार पगार दिला जाणार आहे. सदरील सहाय्यक विधी अधिकारी पदांपैकी दोन अतिक्रमण विभाग आणि एक नगररचना विभागातील प्रलंबित दावे यांच्यावर कारवाई करण्यास मदत होणार आहे.