वाहतूक विभागाच्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, येथील वाहतूक पोलिसांच्या आडमुठेपणा व गैर जबाबदार कारभारामुळे कायम वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे सामान्य जनतेला अनेक प्रकारचे त्रास सोसावे लागत आहेत. कल्याण पश्चिम येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे व त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत म्हणून वाहतूककोंडी होतेय, असे कल्याण वाहतूक पोलीस विभागाचे म्हणणे आहे.
वाहतूक विभागाच्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published on

कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विषेशत: कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी येथे वाहतूक पोलिसांमुळेच वाहतूककोंडी होत असून या विभागाकडून सामान्य जनतेचे होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबविणे तसेच या विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, येथील वाहतूक पोलिसांच्या आडमुठेपणा व गैर जबाबदार कारभारामुळे कायम वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे सामान्य जनतेला अनेक प्रकारचे त्रास सोसावे लागत आहेत. कल्याण पश्चिम येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे व त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत म्हणून वाहतूककोंडी होतेय, असे कल्याण वाहतूक पोलीस विभागाचे म्हणणे आहे. मात्र असे निदर्शनास आले आहे की ज्या पॉईंटवर किंवा चौकावर वाहतूक पोलीस उभे असतात, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मुळात जर का वाहतूक पोलीस कल्याण पश्चिम येथील सुभाष चौक येथे पॉईंटवर उभे राहिले तर हमखास वाहतूककोंडी झालीच पाहिजे, व त्याचे परिणाम कल्याण पूर्व पश्चिम, उल्हासनगर, डोंबिवली, भिवंडी, या परिसरापर्यंत वाहतूककोंडी होत असते. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांचा सध्या उल्हासनगरमध्ये टोइंग व्हॅन विषय सोडून बाकीवरील शहरांमध्ये टोइंग व्हॅन व इतर विषयावर पावती फाडण्याच्या नावावर पिळवणूक होत आहे. त्या माध्यमातून करोडो रुपयांचा मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे.

त्यामुळे शहर व आजूबाजूच्या परिसरात वाहतूक अनियमितता व वाहतूककोंडीचा प्रश्न रोजच उद्भवत असतो. तरी या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन एसआयटी स्थापन करून त्यामार्फत या शहरांमध्ये वाहतूक पोलीस विभागाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ते कार्यवाही करावी, जेणेकरून सामान्य जनतेला वाहतूक पोलिसांच्या हुकुमशाही पद्धतीने दंड वसूल करण्यावर दिलासा मिळेल व भ्रष्टाचाराला आला बसेल तसेच वाहतूक कोंडी पासून जनतेला सोक्षमोक्ष मिळेल अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

टोइंग व्हॅनच्या माध्यमातून भरपूर कमाई

सामान्य जनतेच्या अडचणींकडे लक्ष देण्याऐवजी वाहतूक पोलीस विभाग स्वताचे खिसे भरण्यात जास्त व्यस्त असतात. आता तर वाहतूक पोलीस पैसे वसुली करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनचा चांगले प्रकारे उपयोग करताना दिसून येत आहेत. त्याबद्दल एका मिटींगमध्ये वॉर्डनच्या बाबतीत ठाणे पोलीस आयुक्तांनी हे सांगून वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. तरी ठाणे पोलीस आयुक्त परिक्षेत्रात टोइंग व्हॅनच्या माध्यमातून वाहतूक पोलीस विभाग करोडो रुपये जमा करतात असा आरोप नोवेल साळवे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in