उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी; बदलापूर प्रकरण

स्थितीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि घटनास्थळी नेमके काय घडले याचा शोध घेण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी; बदलापूर प्रकरण
Published on

उल्हासनगर : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून केली जात आहे. या प्रकरणात अधिक तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी आयोगाने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील १० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या घटनेतील पीडितांना तपासणीसाठी या हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते. त्यांच्या स्थितीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि घटनास्थळी नेमके काय घडले याचा शोध घेण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

शनिवारी आयोगाने हॉस्पिटलचे अधीक्षक, डॉक्टर, सुरक्षारक्षक, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईत बोलावले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सर्वजण मुंबईत होते, जिथे त्यांचे जबाब नोंदवले गेले. या मुलींना कसे आणले गेले, त्यांच्यावर कोणती उपचार प्रक्रिया राबवली

गेली. उपचारांमध्ये दुर्लक्ष झाले का किंवा राजकीय किंवा इतर कोणता दबाव आला का, याचीही चौकशी केली जात आहे. बालकांचे संरक्षण आयोगाचे अध्यक्ष रूपाली बनर्जी सिंह यांनी या प्रकरणाची दोन दिवसांपासून सखोल चौकशी सुरू ठेवली आहे. शुक्रवारी, त्यांनी बदलापूरला भेट दिली आणि शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळेची मुख्याध्यापिका, शिक्षक आणि आया यांची बदलापूर येथे जवळपास सहा तास चौकशी केली.

असंवेदनशीलता दिसून येते. तसेच, या अल्पवयीन मुलींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाने १२ तासांचा वेळ घेतला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

समिती सदस्य आणि बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी `नवशक्ति’ला सांगितले की, आम्ही अहवाल सरकारला सादर केला आहे. शाळा, रुग्णालय, पोलीस किंवा सरकार या सर्वच स्तरांवर मोठ्या चुका आढळल्या आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, शाळेच्या प्रशासन आणि व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. 

सरकार या अहवालाचा आढावा घेईल आणि तो पोलीस विभागाकडे  सुपूर्द करेल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुढील आठवड्यात समितीने दिलेल्या निरिक्षणांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. या अहवालातून दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनाला कारवाई करण्याबाबत निर्देश दिले जातील.

गेल्या आठवड्यात बदलापूर येथील चार वर्षाच्या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे वाहतूक १० तासांहून अधिक काळ रोखून धरली होती.

logo
marathi.freepressjournal.in