एसटीत राखीव जागांवर बसणे झाले मुश्किल ;उभ्याने करावा लागतो प्रवास

एसटी स्थानकात असेपर्यंतच राखीव जागांवर तेच प्रवासी बसू शकतात. प्रवासादरम्यान मात्र इतरांना तेथून उठवता येत नसल्याचा नियम आहे.
एसटीत राखीव जागांवर बसणे झाले मुश्किल ;उभ्याने करावा लागतो प्रवास

जव्हार: सुरक्षित आणि रास्त दराचा विचार करीत आजही जव्हार तालुक्यातील प्रवासी हा प्रवासाच्या दृष्टिकोनातून एसटीला प्राधान्य देत आहे.  शिवाय ज्येष्ठ आणि महिलांना तिकीटदरात सवलत, ७५ वर्षांपुढच्या व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा अश्या योजनांमुळे एस टी सध्या जोमात आहे; मात्र हे असताना एस टी तील राखीव जागांवर बसणे मुश्किल होऊन उभ्याने प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.

एसटीमध्ये महिला, ज्येष्ठ , विधानसभा, विधानपरिषद सदस्य, पत्रकार आणि दिव्यांगांकरिता ठरावीक आसने राखीव असतात; मात्र, मात्र, एसटी फलाटावर लागताच अनेकजण पळत जाऊन खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून जागा आरक्षित करून घेतात. राखीव जागांवर पुरुष मंडळी हक्क गाजवितात. महिला, ज्येष्ठ मात्र उभे राहून प्रवास करतात, असे चित्र निर्माण झाले आहे.हे नियमाला धरून नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे, यावर जव्हार एस टी आगार व्यवस्थापक यांनी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एसटीतील राखीव जागांचा मात्र काहीच फायदा नसून घालून दिलेला नियम कुणीही पाळत नसल्याचे महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी सांगितले असून, राखीव जागांवर बसतो दुसराच!

बसमध्ये कोणासाठी किती जागा राखीव?

एसटी बसमध्ये दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक, आमदार, खासदार, पत्रकार, आदी घटकांकरिता आसने राखीव ठेवलेली असतात. असे असले तरी गाडी बसस्थानकात असेपर्यंतच या आसनांवर संबंधितांकडून हक्क सांगितला जाऊ शकतो.

राखीव जागांचे नियम काय?

एसटी बसमध्ये राखून ठेवल्या जाणाऱ्या जागांवर त्याच प्रवाशांना जागा मिळायला हवी; मात्र हा नियम केवळ फलाटावर उभ्या असलेल्या गाडीतच लागू होतो. नंतर जागेवर हक्क राहत नसल्याची माहिती मिळाली.

राखीव जागेवरील प्रवाशाला उठवता येत नाही का?

एसटी स्थानकात असेपर्यंतच राखीव जागांवर तेच प्रवासी बसू शकतात. प्रवासादरम्यान मात्र इतरांना तेथून उठवता येत नसल्याचा नियम आहे.

एसटी बसमध्ये आरक्षित जागांवर गरजूंना बसू देण्यासाठी अन्य प्रवाशांनी पुढाकार घ्यायला हवा; मात्र या प्रश्नावरून अनेक वेळा वादाचे प्रसंग घडतात.शिवाय, वाहकांना देखील आरक्षित जागांबाबत सूचना देण्यात येतील.

-राकेश देवरे, आगार व्यवस्थापक, जव्हार.

logo
marathi.freepressjournal.in