गणेशपुरीत आदिवासी संस्कृतीचा जागर; आदिवासी महोत्सवात उत्कृष्ट नागरिकांचा सन्मान

या आदिवासी महोत्सवात सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गणेशपुरीत आदिवासी संस्कृतीचा जागर; आदिवासी महोत्सवात उत्कृष्ट नागरिकांचा सन्मान

ठाणे: आदिवासी संस्कृती जोपासली जावी आणि तिचा सर्वदूर प्रसार व्हावा, या उद्देशातून आदिवासी क्रांती सेना यांच्या वतीने अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय आदीवासी सांस्कृतिक व कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी भिवाळी, (भाऊराव पाटील मैदान) येथे करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

या आदिवासी सांस्कृतिक व कला क्रीडा महोत्सवात विविध कला कृतीच आयोजन नागरिकांना बघायला मिळणार असून,आदिवासी संस्कृतीला उजाळा देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. आदिवासी जनजीवन, आदिवासी कसे राहायचे, निसर्ग देखावा, त्यांची संस्कृती तसेच निसर्ग देखावा पर्यावरणाची निगा कशी राखावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी समाजावर गाणे तसेच तारपा गवत्या, धुमश्या, नृत्य तर इतर नृत्य सादर करण्यात येणार आहेत. तर प्रख्यात गायक जगदीश पाटील, वैष्णवी पाडेकर, दयानंद म्हस्कर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या ठिकाणी जुनी अवजारे यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

या आदिवासी महोत्सवात सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या आईवडिलांनी कोणते अवजारे वापरून शेती तसेच कष्ट केले या प्रदर्शनातून मांडण्यात आले होते. कालांतराने या गोष्टी हळूहळू नष्ट होणार आहेत, म्हणून या गोष्टीची आठवण तसेच येणाऱ्या नवीन पिढीला या गोष्टींची आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी; प्रत्येक समजाचे प्रबोधन व्हावे व आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पाहणारा प्रत्येक व्यक्ती एक सामाजिक संदेश घेऊन जावा.

-अनिल भांगले, संस्थापक अध्यक्ष आदिवासी क्रांती सेना

logo
marathi.freepressjournal.in