जितेंद्र आव्हाड यांनी अफजल खानवर प्रवचन द्यावे; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

हिंदू देवदेवतांवर भाष्य केल्याने मुंब्रा येथील मतदार आनंदी होतील असे त्यांना वाटते.
जितेंद्र आव्हाड यांनी अफजल खानवर प्रवचन द्यावे;  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

कल्याण : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवदेवतांवर बोलण्यापेक्षा अफजल खान, औरंगजेब यांच्याबद्दल मुंब्रा येथे जाऊन प्रवचन करावे, असा सल्ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. यासंदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे डीप क्लीन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशांतता पसरवण्यामध्येच पीएचडी केली आहे. हिंदू देवदेवतांवर भाष्य केल्याने मुंब्रा येथील मतदार आनंदी होतील असे त्यांना वाटते. त्यामुळे मुंब्रा येथे जाऊनच त्यांनी अफजल खान, औरंगजेब यांच्यावर प्रवचने द्यावीत. हिंदू देवदेवतांविरोधात वक्तव्य होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या डीप क्लीन मोहिमेची मुंबई येथून सुरुवात झाली. आज त्याचा कल्याण महापालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून बाहेरून देखील कामगार मागवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in