रोख्यांच्या बदल्यात ठेका; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेला बोरिवली-ठाणे हा बहुचर्चित बोगद्याचा प्रकल्प निवडणूक भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
रोख्यांच्या बदल्यात ठेका; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घ्या आणि १४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळवा असा कारभार सध्या सुरू आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेला बोरिवली-ठाणे हा बहुचर्चित बोगद्याचा प्रकल्प निवडणूक भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रकल्पाचे १४ हजार ४०० कोटी रुपयांचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याच कंपनीने ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे १४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळवा आणि ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घ्या, असा हा कारभार आहे. हा रस्ता म्हणजे पैसे खाण्याचे कुरण असून रोख्यांच्या बदल्यात ठेका असा प्रकार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला. यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना हजारो कोटी रुपये दान करणाऱ्या ‘दानशूर’ कंपन्यांची नावे पुढे आली आहेत. यापैकी मेघा इंजिनिअरिंग या कंपनीने ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कंपनीला बोरिवली ते ठाणे या जुळ्या बोगद्यांचे सुमारे १४ हजार ४०० कोटी रुपयांचे कंत्राट एमएमआरडीएने नुकतेच बहाल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा प्रकल्प कुणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो, असा सवाल करत आव्हाड यांनी या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in