कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे.
कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही
Published on

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरुवार, दि. ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत असे २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तरी या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in