Kalyan-Dombivli : व्हेल माशाच्या ६ कोटी २० लाख रुपयांच्या उलटीची विक्री; तिघांना अटक

व्हेल माशाची उलटी विक्री करण्याकरिता आलेल्या तिघांना घातल्या बेड्या
Kalyan-Dombivli : व्हेल माशाच्या ६ कोटी २० लाख रुपयांच्या उलटीची विक्री; तिघांना अटक
Published on

डोंबिवली : व्हेल माशाची उलटी विक्री करण्याकरिता आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास काहीजण चारचाकी वाहनामधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी मौर्या धाब्याच्या बाजूला, बदलापूर पाईपलाईन रोड, मानपाडा डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

याप्रसंगी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून कारवाई करून तीन संशयितांना माशाची उलटी अनधिकृतरीत्या जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी अनिल भोसले (५५), अंकुश माळी (४५), लक्ष्मण पाटील (६३) यांना अटक केली. त्याच्याकडील चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची सहा कोटी वीस लाख रुपये किमतीची सफेद रंगाच्या पिशवीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. पोलिसांनी मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगनआर कारसह विविध मोबाईलही जप्त केले.

logo
marathi.freepressjournal.in