कल्याण-डोंबिवलीत नऊ तास पाणीपुरवठा बंद, साठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामधून उल्हास नदीतून उचललेले पाणी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात पुरवठा केला जातो. या उदंचन केंद्रातील तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर डोंबिवली विभागाच्या वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत.

त्यामुळे मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (एकूण ९ तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद (शटडाऊन) राहणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in