कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम

कल्याणमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाने झटका दिला. आरोपी जीवन शिरसाट याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत न्यायालयाने आरोपीचे अपील फेटाळून लावले.
कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम
कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायमप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : कल्याणमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाने झटका दिला. आरोपी जीवन शिरसाट याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत न्यायालयाने आरोपीचे अपील फेटाळून लावले.

न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. थेट डोक्यावर गोळी झाडण्याचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

२०१५ मध्ये गोळीबाराची घटना घडली होती. तक्रारदार सरफराज सय्यद याच्यासोबत आरोपी जीवन शिरसाटचा पैशांवरून वाद सुरू होता. ७ जून २०१५ रोजी दुपारी जीवनने सरफराजला कल्याणमधील वल्लीपीर चौक येथे भेटायला बोलावले. सरफराज तिथे पोहोचल्यावर जीवनने हुंडई कारमधून साथीदारांसह उतरून सरफराजच्या डोक्याला बंदूक लावून थेट गोळी झाडली. याप्रकरणी ४ ऑगस्ट २०१८ रोजी कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जीवन शिरसाटला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in